
भर रस्त्यावर कामगाराच्या हातातील तीन लाखांहून अधिक रक्कम असलेली पिशवी हिसकावून चोरट्याचे पलायन, आसलगाव येथील घटना
आसलगाव :- येथे एका देशी दारू दुकानातील रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या कामगाराच्या हातून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३४ हजार रुपयांची पिशवी हिसकावून पलायन केले. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. बाबुराव रामभाऊ चोपडे हे गेल्या १५ वर्षांपासून गोविंद भिकारी अग्रवाल यांच्या देशी दारू दुकानातील रोकड सांभाळण्याचे व ती बँकेत भरण्याचे…