Headlines

दुर्गा वहिनी राष्ट्रधर्म संस्कृतीचे रक्षणासाठी कटिबद्ध आहे, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष राजेश झापर्डे यांचे प्रतिपादन

मलकापूर:- श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या विविध आयामांच्या संदर्भात पात्रता, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमांमुळे बजरंग दलाला देशभरात मान्यता मिळाली होती. त्याच्या गतिशील योगदानाचा परिणाम म्हणून, देशभरातील नव-युवक विहिंपकडे आकर्षित झाले. देशाच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने तरुण बजरंग दलात सामील झाले आहेत. त्याचप्रमाणे मुलीही विहिंपकडे आकर्षित झाल्या.सेवा,सुरक्षा, संस्कार आणि गतिमानतेची भावना जागृत करण्यासाठी तसेच त्यांच्याशी संबंधित विविध समस्यांचे…

Read More

मलकापूर उपविभागीय कार्यालयचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता अनिल ए. शेगांवकर यांनी एन.एस.सी.योजने मार्फत केलेल्या महाघोटाळ्याची चौकशी करण्यात यावी – कुणाल सावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

मलकापूर, जि. बुलढाणा विभागीय कार्यालया अंतर्गत मलकापूर विभागातील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता अनिल ए. शेगांवकर यांनी २०१९ ते २०२३ पर्यंत गरजू व आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटाकापर्यंत विज वाहीनी पोहचविण्यासाठी नविन विज जोडणी योजना (न्यु सर्व्हस कनेक्शन स्किम) एन.एस.सी. ही योजना महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये गोरगरीबांच्या कल्याणासाठी आणली होती. त्यावेळेसचे मलकापूर येथील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता श्री. अनिल ए….

Read More

मानव अधिकार रचनात्मक सेवा संस्थांच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी कुणाल सावळे यांची निवड

मलकापूर:- सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले कुणाल सुधीर सावळे यांची मानव अधिकार रचनात्मक सेवा संस्थांच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्राची आवड असलेले कुणाल सुधीर सावळे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यांच्या कडून सहा महिन्यात मानव अधिकार रचनात्मक सेवा संस्थांनंचे नाव उज्वल करण्यासाठी मोठे योगदानाची अपेक्षा संस्थानकडून ठेवण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व…

Read More

न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या महिलेने चक्क मलकापूर शहर पोलीस निरीक्षकांचीच आरती ओवाळण्याचा केला प्रयत्न..

मलकापूर:- शहरातील एका प्रख्यात डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने आपल्या मुलाचा पाय कायमचा जायबंदी झाल्याचा आरोप करत या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मलकापूर शहरातील एका महिलेने केली होती. मात्र एक महिना होऊनही पोलिसांनी कुठलीही कारवाई या डॉक्टर विरोधात केली नसल्याने आणि गुन्हाही नोंदवला नसल्याने या पीडित महिलेने चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन त्यांची आरती केली. काल…

Read More

बाजार समिती सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव; 14 संचालकांचे जिल्हाधिकारी यांना पत्र

मलकापूर : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरुद्ध सहकारी संचालक मंडळातील १६ संचालकांपैकी १४ संचालकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे आज २१ मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केल्याने राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. गतवर्षीच मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपा नेते चैनसुख संचेती…

Read More

मलकापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ,दोन घरे फोडले, दाग दागिन्यांसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

मलकापूर :- घराचा कडी कोंडा तोडून डाग दागिने व रोख रक्कम असा एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.18 मे ते 20 मे दरम्यान शहरातील मधुवन नगर येथे घडली. याप्रकरणी ( रीना सुरवाडे वय 24 )रा. मधुबन नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी तक्रारी म्हटले आहे कि…

Read More

विद्या विकास जुनियर कॉलेज वाकोडीचा 12 वी विज्ञान शाखा 99.18℅ तर कला शाखा 85.45 ℅ निकाल

मलकापूर – येथून जवळच असलेल्या विदया विकास जुनियर कॉलेज वाकोडी या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा 99.18% लागला आहे. तसेच कला शाखेतून 85.45% निकाल लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातुन यावर्षी विज्ञान शाखेतून 245 विद्यार्थी तर कला शाखेतुन 55 एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विज्ञान शाखेतून 242 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेतून 47…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू, बोदवड रोडवरील घटना

मलकापूर :- येथील 33 वर्षीय युवक मोटरसायकल ने बोदवड कडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना दी.20 मे रोजी पहाटे साडेसहा च्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की नितेश भालचंद्र हिवराळे वय 33 रा. वडगाव डिघी ता. नांदुरा ह.मु. गोकुळधाम मलकापूर हा क्रेन मशीनचे कॉन्टॅक्ट बेसवर रेल्वेचे काम करीत असून त्याच्याकडे असलेली हिरो…

Read More

माता महाकाली नगर रोडवर धारदार शस्त्राने एकाच्या डोक्यात वार; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- एकाने दुसऱ्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना आज दि 19 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील माता महाकाली नगर रोडवरील जयकार इलेक्ट्रॉनिक जवळ घडली. या घटनेतील मारेकरीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की अमरलाल लालचंद परियानी राहणार सिंधी कॉलोनी हे भुसावळ जाण्यासाठी निघाले. माता महाकाली नगर…

Read More

कामावरून घरी जात असलेल्या युवकाच्या डोक्यात दगड टाकला, एकास लोखंडी रॉडने मारहान, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- कामावरून घरी जात असलेल्या युवकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि.14 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोहनपुरा भागात घडली. याप्रकरणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सैय्यद अजिग सैय्यद नुरा यांनी शहर पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की शेख आबीद…

Read More
error: Content is protected !!