
पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणावर नगरपालिका नियंत्रण आणणार का? शहरातील पाणीपुरवठ्याचे ठोस नियोजन कधी होणार?
मलकापूर ( उमेश ईटणारे ):- शहरातील माता महाकाली नगर परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. नगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना अजूनही अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पाणीपुरवठा कर्मचारी फोन उचलत नसल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत. पाणीपुरवठ्याचे ठोस नियोजन कधी होणार? शहरात सध्या दहा-दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे, मात्र नागरिकांना याची कोणतीही पूर्वसूचना…