तिकीट वाटपातील अन्यायाचा स्फोट; मलकापूर भाजपात राजीनाम्यांची मालिकाच; सच्च्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप; शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
मलकापूर : नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीनंतर मलकापूर भाजपामध्ये अंतर्गत नाराजीचा उद्रेक होत असून, तिकीट वाटपात सच्च्या व मेहनती कार्यकर्त्यांना डावलून केवळ चेहरे व संबंध पाहून उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप करत भाजपाचे शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज, २४ डिसेंबर रोजी, आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष संतोष…
