
बुलढाणा जिल्ह्यातील ह.भ.प. उदबोध महाराज पैठणकर यांचा दुबईत कीर्तन व प्रचार दौरा
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. उदबोध महाराज पैठणकर यांचा दुबईत कीर्तन व प्रचार दौरा ८ ते १३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महाराजांचे हे दौरे महाराष्ट्र मंडळ, दासबोध अभ्यासवर्ग व गणेश भजन मंडळ यांच्या संयोजनाने होत असून, दुबईतील मराठी मंडळींसाठी हा एक विशेष अध्यात्मिक व सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे….