
सिंदखेडराजा येथे बँकेसमोरून भरदिवसा मोटारसायकल डिक्कीतून अडीच लाखांची चोरी!
सिंदखेडराजा: शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेसमोर उभी असलेल्या मोटारसायकलची डिक्की फोडून अज्ञात चोरट्याने अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. चिंचोली जहागीर (ता. सिंदखेडराजा) येथील शेतकरी अनिल राठोड हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर आपल्या एम. एच. २८ एएम १३६१ क्रमांकाच्या मोटारसायकलजवळ उभे राहून नातेवाईकांशी संवाद साधत होते. त्याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारसायकलच्या…