
पतंग उडवताना आठ वर्षीय यशचा विहिरीत पडून मृत्यू!
शिर्डी :- शिर्डीच्या जवळील सावळीविहीर खुर्द येथे बुधवारी (दि. २५) दुपारी हृदयद्रावक घटना घडली. पतंग उडवत असताना आठवर्षीय यश हिरामण सोनवणे (वय ८) हा खोल विहिरीत पडला, ज्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यश हा पहिली इयत्तेत शिकत होता आणि नाताळाच्या सुट्टीत घराजवळच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता पतंग पकडण्याच्या प्रयत्नात तो अचानक विहिरीत पडला….