Headlines

डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; मेहकर तालुक्यातील घटना!

  डोणगाव (ता. मेहकर):- येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या श्रीकृष्ण विजय बनसोड (३५, रा. लोणार) यांनी ९ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे आलेल्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारींनंतर ३ जानेवारी रोजी त्यांच्या दवाखान्यावर धाड टाकून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…

Read More

दर्शनाला जात असतांना समृद्धी महामार्गावर अपघात; टायर फुटल्याने कार पलटी, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी!

मेहकर : – नाशिकहून शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनाला जाणाऱ्या खुळे कुटुंबीयांच्या कारला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर टोल क्रमांक २९१ जवळ गाडीचे टायर फुटल्याने नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात महेश खुळे (वय ४४) गंभीर जखमी झाले. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच दीपाली…

Read More

चोरीच्या संशयावरून मारहाण: युवकाचा मृत्यू, चार आरोपींना अटक; मेहकर तालुक्यातील घटना

  डोणगाव (बुलढाणा) – मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विश्वी गावात चोरीच्या संशयावरून एका ३८ वर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा घरी जाऊन मृत्यू झाला. ही घटना ५ डिसेंबर रोजी दुपारी घडली असून, डोणगाव पोलिसांनी या प्रकरणात चौघा आरोपींना तातडीने अटक केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पवन गुलाब राठोड…

Read More

गुलालाची विक्री कराल तर खबरदार,१०८० किलो रासायनिक गुलाल जप्त, पोलिसात गुन्हा दाखल!

हिवरा आश्रम : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत रासायनिक गुलालाची उधळण, विक्री व साठवणुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्पूर्वीच कायमस्वरूपी बंदीचा आदेश जारी गेला होता. दरम्यान साखरखेर्डा येथे १४ सप्टेंबर रोजी रासायनिक गुलाल विक्रीस ठेवणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलीस, महसूल विभाग व ग्रामपंचायतच्या वतीने संयुक्त कारवाईचा बडगा उगारण्यात येऊन ९ हजार रुपये किमतीचा १०८० किलो गुलाल हस्तगत करून गुन्हा नोंदविण्यात आला…

Read More

कळंबेश्वर ते कासारखेड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात!

मेहकर :- ( सतीश मवाळ )तालुक्यातील ग्राम पंचायत कासारखेड ते कळंबेश्वर रस्त्याला अनेक वर्षा पासून प्रशासनने दुर्लक्ष केल्यामुळे रोड खड्ढे मय झाला आहे . तसेच परिसरातील पाईप लाईन धारकांनी मोठ्या प्रमाणावर रोडचे खोदकाम केलेले आहे.त्याबाबत प्रशासनाची परवानगी घेतली असावी किंवा नसावी त्यामुळे त्या ठिकाणी भरावा व्यवस्थीत न केल्याने तेथील माती पावसामुळे खाली बसून त्यांचे नालीत…

Read More

बनावट नोटांद्वारे दारूची करत होते खरेदी; तिघांविरोधात गुन्हा दाखल

मेहकरः बनावट नोटांद्वारे मेहकरध्ये दारू खरेदी करण्यात आल्याचा प्रकार २५ जुलै रोजी उघड झाला असून या प्रकरणी पोलिसांनी डोणगावातील दोन व वाशिम जिल्ह्यातील एक अशा तिघांविरोधात बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सोहम सखाराम खेत्रे (रा. पिंप्री सरहद, जि. वाशिम), जगदिश अशोक पांडव आणि गजानन लक्ष्मण मुळे (रा. डोणगाव, ता मेहकर) अशी आरोपींची नावे आहेत….

Read More

उपचारादरम्यान सुरक्षा रक्षकाचे निधन,जालना येथे मैदान चाचणीत धावताना खाली पडून गंभीर जखमी झाला होता तरुण

मेहकर : राज्य राखीव पोलीस दलात भरतीसाठी जालना येथे मैदान चाचणी दरम्यान धावताना पडल्याने गंभीर जखमी सुरक्षा रक्षकाचे १९ ला उपचारादरम्यान निधन झाले आहे. मेहकर तालुक्यातील उकळी येथील ऋषीकेश कैलास चनखोरे (वय २६) हा तरुण मुंबई येथे महाराष्ट्र सुरक्षा दलात ओशिवरा मेट्रो स्टेशन मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होता. ११ जुलैला जालना येथे राज्य…

Read More
error: Content is protected !!