
दुर्दैवाच्या धक्क्याने उसवलेले कुटुंब – चिखली-मेहकर रस्त्यावर एकाच अपघातात पती – पत्नीसह मुलाचा मृत्यू
चिखली : एका आनंदी प्रवासाचे दुःखद शेवट! रस्त्यावरचा एक क्षणाचा हलगर्जीपणा अख्ख्या कुटुंबावर काळाचा घाला ठरला. चिखली-मेहकर रोडवरील खैरव फाट्याजवळ ४ जून रोजी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात पती, पत्नी आणि त्यांचा अल्लड बालक जागीच मृत्युमुखी पडले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाही तुटल्या. खैरव फाटा ते मुंगसरी फाटा दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास मालवाहू…