
अंत्यविधीची तयारी झाली अन् .. “विठ्ठलाच्या कृपेने मृत्यूच्या दारातून परतले पांडू तात्या; पांडू तात्याच्या पुनर्जन्माची विलक्षण कहाणी..
कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील पांडुरंग रामा उलपे ऊर्फ पांडू तात्या यांनी मृत्यूला जवळून पाहिल्यानंतर जीवनाची नवीन दिशा मिळाल्याची विलक्षण घटना घडली आहे. त्यांनी सांगितले की, “विठ्ठलाच्या कृपेनेच माझा पुनर्जन्म झाला आहे. संक्रांतीनंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या चरणांवर डोके ठेवणार आहे.”पंधरा दिवसांपूर्वी पांडू तात्या नेहमीप्रमाणे देवाची पूजा करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा…