
अवैध देशी दारू विक्रेत्यावर नांदुरा पोलिसांची कारवाई.. एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदुरा :- निमगाव येथे सार्वजनिक रोडवर घरासमोर अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर २ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे देविदास अंबादास जामोदे (वय ४४) याला ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत ९० मिलीच्या देशी दारूच्या २० सीलबंद बाटल्या, १००० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि वायरची थैली जप्त करण्यात आली. आरोपीवर…