शेतातून 40 कट्टे हरभरा चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना
शेगाव – तालुक्यातील भोनगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातून तब्बल ४० कट्टे हरभरा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोनगाव येथील शेतकरी राजेश विलासराव शेळके (वय ४९) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, गट क्रमांक ५३६ व ५३७ मधील शेतात रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. २१ फेब्रुवारी रोजी…
