कुहीत ‘हरित महाराष्ट्र’ अंतर्गत १०० झाडांची लागवड, होमगार्ड पथकाचा उपक्रम!
नागपूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) जिल्ह्यातील कुही तालुक्यात हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, अभियानांतर्गत २४ सप्टेंबर रोजी १०० झाडांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम कुही होमगार्ड पथकाने राबवला. वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण कार्यालय कुही मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका, सावंगी पचखेडी येथून विविध प्रकारची झाडे आणण्यात आली. जांभूळ, करंजी, कडुलिंब, शिताफळ, आवळा, जांब, बेहळा, बदाम,…
