
घरात शिरलेल्या सापाचा बहीण भावावर हल्ला.. बहिणीचा मृत्यू; भावावर उपचार सुरू!
जालना : – अंबड शहरालगतच्या म्हाडा कॉलनीत शनिवारी (1 मार्च) पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सापाच्या दंशाने 8 वर्षीय श्रध्दा मनोहर खरात हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिचा 14 वर्षीय भाऊ मकरंद खरात जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोहर खरात हे आपल्या पत्नी, आई आणि पाच मुलांसह पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. अपुऱ्या जागेमुळे कुटुंबातील काही…