Headlines

धक्कादायक; प्रसिद्ध रील स्टार विकी पाटीलचा खून, माजी सैनिक असलेल्या वडिलांनी स्वतःही केली आत्महत्या; चिट्ठीत लिहिले..

जळगांव :- धरणगाव-एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सैनिक असलेल्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर उघड झालेल्या सुसाईड नोटमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या नोटमध्ये त्यांनी स्वतःच मुलाचा खून केल्याची कबुली दिली असून, त्याचा मृतदेह धरण परिसरात पुरला असल्याची माहिती दिली आहे. सुसाईड नोटमुळे उलगडला खुनाचा तपास विठ्ठल सखाराम पाटील (माजी सैनिक) यांनी…

Read More

रेल्वेला आग लागल्याच्या अफवेमुळे उड्या मारलेल्या ११ प्रवाशांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी.. जळगाव जिल्ह्यात मोठी दुर्घटना!

जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून ब्रेक दाबल्यानंतर धुर आणि ठिणग्या निघाल्याने आग लागल्याची अफवा पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी रुळांवर उड्या मारल्या. दुर्दैवाने, याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना उडवलं. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत….

Read More

दोन्ही किडनी निकामी असलेल्या मुलीला वडिलांनी दिली किडनी दान; किडनीदानातून मुलीचा पुनर्जन्म”

  जळगाव : मानवतेच्या सर्वोच्च प्रतीकाला उजाळा देणारी घटना रावेर तालुक्यातील मांगलवाडी येथे घडली आहे. येथील ५९ वर्षीय बाबुराव कोळी यांनी आपल्या किडनी विकाराने त्रस्त असलेल्या २९ वर्षीय मुलीला आपली किडनी दान करून तिला नवीन जीवन दिले.रुपाली योगेश कोळी (साळुंखे) (रा. चिंचोली, ता. यावल) या तरुणीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे ती अडीच वर्षांपासून डायलिसिसवर होती….

Read More

सिलेंडरच्या स्फोटात चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक, १० जण गंभीर जखमी!

वृतसंस्था जळगाव :- शहरातील इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाला.या स्फोटात चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाली. तर १० जण गंभीर जखमी झाले. शहरातील इच्छादेवी चौकातील एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये चारचाकी वाहनात घरगुती गॅस भरत असताना अचानकपणे सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. वाहनाजवळ उभे…

Read More

शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीची आमिष दाखवून प्राध्यापिकेची १ कोटी ५ लाखांची फसवणूक.. दोन आरोपींना हरियाणा येथून अटक!

वृतसंस्था ) जळगाव : शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्राध्यापिकेची एक कोटी रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी मुकेश सुभाष (२६), अंकुश सतपाल (२७), दोघे रा. नाधोरी ता. भुना जि. फतेहबाद, हरयाणा या दोघांना जळगाव सायबर पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोन जणांना या पूर्वीच अटक केलेली आहे. आता…

Read More

रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे खाली आल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू!

जळगाव:- तालुक्यातील नशिराबाद येथील तरूण हा रेल्वे रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२४ रोजी रात्री ११ वाजता भादली रेल्वे स्टेशन जवळ उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अविनाश सुरेश देवरे (वय २७ रा. नशिराबाद ता. जळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव एमआयडीसीतील…

Read More

मलकापुरच्या युवकांचा मुक्ताईनगर उड्डाणंपुलावर अपघात,एक जागीच ठार तर एक सुदैवाने बचावला

मलकापूर:- ओव्हरटेक करत असतांना रोडवर पडलेल्या पाण्यामुळे दुचाकी स्लिप होऊन दुचाकी स्वार कंटेनरच्या खाली आल्याने कंटेनर चालकाने दूरपर्यंत फरफटत नेले यात एक जण जागीच ठार झाला तर एक जण सुदैवाने बचावला आहे ही घटना आज दि. 25 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील उडान पुलावर घडली. मृतक हा मलकापूर शहरातील स्थानिक रामदेवबाबा नगर…

Read More

आधी लग्नाचे आमिष दिले,नंतर फोटो व्हिडीओ तसेच बंदुकीचा धाक दाखवित महिलेवर वारंवार अत्याचार केला, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

जळगाव : प्रेमाच्या जाळ्यात ओढत व लग्नाचे आमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेवर २६ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. लग्नाला नकार दिल्यानंतर महिलेने संबंध तोडले असता या तरुणाने व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तसेच बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करून पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी गुरुवार, ६ जून रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात भुमेश बापू निंबाळकर (२६, रा….

Read More
error: Content is protected !!