Headlines

जिल्हा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा ऐवज जप्त!

 

मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहरात विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून अंदाजे २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी एका नागरिकाला ऑटो थांबवून मारहाण करत खिशातील २,७०० रुपये व मोबाईल हिसकावण्यात आला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली. शंतनु चंद्रकांत गुरव (१९), रा. जळगाव खांदेश, सुरजसिंह सचिन परदेशी (१९), रा. बाजीप्रभू नगर, मलकापूर
संकेत सुनील उन्हाळे, रा. साईनगर, मलकापूर या आरोपींविरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशन आणि धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून एकूण २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे, एपीआय संजय मातोंडकर आणि त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!