नांदुरा ,:बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील काटी गावातील नेहा जुनारे देशपांडे यांनी भारतीय सैनिकांसाठी स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट्स विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुजरातच्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमधून बॅलिस्टिक सामग्रीवर पीएचडी पूर्ण करून त्यांनी या क्षेत्रात नवीन शोध लावले आहेत.
नेहा यांनी थ्री-डी विणलेल्या कापडांचा वापर करून एक नवीन प्रकारची चिलखती सामग्री विकसित केली आहे, जी तांत्रिकदृष्ट्या उन्नत आणि अधिक प्रभावी आहे. त्यांच्या या संशोधनाला पेटंट मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उल्लेखनीय बाबी
शैक्षणिक उत्कृष्टता: नेहा यांनी गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून पदवी आणि पदव्युत्तर दोन्ही पदव्या प्रथम श्रेणीत प्राप्त केल्या आहेत.
कौटुंबिक पाश्र्वभूमी: त्यांचे वडील प्रा. डॉ. शंकर जुनारे हे भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय न्याय वैद्यकविज्ञान विद्यापीठाचे संचालक आहेत, तर पती विनायक देशपांडे हे इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत.
व्यावसायिक अनुभव: सध्या त्या श्रीमती नेहा, अरविंद कंपोझिट लिमिटेड येथे व्यवस्थापक, संशोधन आणि विकास म्हणून कार्यरत आहेत.
नेहाच्या या यशाने बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो. त्यांचे हे संशोधन देशाच्या सुरक्षा दलांना अधिक प्रभावी बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.