Headlines

बुलढाणा पोलिस दलात खळबळ; महिला पोलीस अधिकाऱ्यावर १० लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप!

 

बुलढाणा : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) पोलिस मुख्यालयातील महिला अधिकारी दीपमाला उंबरकर यांच्यावर तब्बल ₹१०,१७,००० रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. पोलीस नापोकॉ. संतोष तुकाराम धंदर यांनी या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये दीपमाला उंबरकर यांनी कॅन्सरग्रस्त भावाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितली होती. मानवतेच्या भावनेतून तक्रारदार संतोष धंदर यांनी SBI बँकेतून कर्ज काढून पैसे उपलब्ध करून दिले. मात्र उंबरकर यांनी मोबाईल आणि YONO अॅपच्या माध्यमातून धंदर यांच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. २२ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत एकूण १० लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय नागरे आणि पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. तक्रारदार धंदर यांनी सांगितले की या फसवणुकीमुळे त्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत असून मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि कर्ज हप्ते भरणे कठीण झाले आहे. या प्रकरणामुळे पोलिस दलातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा खुलासा करून आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!