नांदुरा :- नवीन बसस्थानक परिसरात दुचाकी चोरीची घटना घडली आहे. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० च्या दरम्यान घडल्याचे समजते. तालुक्यातील वाडी येथील रहिवासी गोपाल सुखदेव चव्हाण, हे ऑटोचालक असून त्यांनी त्यांच्या एमएच २८-एपी ३०६५ क्रमांकाच्या दुचाकीला बसस्थानकात उभी केली होती. काही वेळानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून आली नाही.
या प्रकरणी त्यांनी तातडीने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार मिलिंद जवंजाळ करीत आहेत.