खामगाव ( दिपक इटणारे ):- प्रेमाचा शेवट इतका भीषण असेल, याची कुणालाच कल्पना नव्हती…! प्रेमकहाणीचा गोडवा एका क्षणात रक्तरंजित वळणावर जाऊन संपला. दोन हृदयं, जी एकमेकांसाठी धडधडत होती, तीच अखेरच्या क्षणी एकमेकांच्या विरुद्ध उभी ठाकली.
खामगाव शहराला हादरवणारी ही थरारक घटना घडली जुगनू हॉटेलमध्ये. साखरखेर्डा परिसरातील प्रियकर–प्रेयसीच्या या नात्याचा शेवट चाकूच्या वारात झाला. ऋतूजा पद्माकर खरात हिला तिच्या प्रियकर साहील उर्फ सोनू राजपूतने निर्दयीपणे ठार मारलं, आणि लगेचच स्वतःचाही जीव घेतला. पोलिस तपास सुरू असून, या घटनेने खामगाव शहरात खळबळ उडाली आहे. प्रेमाच्या नावाखाली दोन जीव गेले… पण मागे सोडून गेले फक्त प्रश्नचिन्हे आणि हळहळ.