Headlines

गुलालाची विक्री कराल तर खबरदार,१०८० किलो रासायनिक गुलाल जप्त, पोलिसात गुन्हा दाखल!

हिवरा आश्रम : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत रासायनिक गुलालाची उधळण, विक्री व साठवणुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्पूर्वीच कायमस्वरूपी बंदीचा आदेश जारी गेला होता. दरम्यान साखरखेर्डा येथे १४ सप्टेंबर रोजी रासायनिक गुलाल विक्रीस ठेवणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलीस, महसूल विभाग व ग्रामपंचायतच्या वतीने संयुक्त कारवाईचा बडगा उगारण्यात येऊन ९ हजार रुपये किमतीचा १०८० किलो गुलाल हस्तगत करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांकडे रासायनिक गुलालाची साठवणूक किंवा विक्री होत आहे का? याचा शोध घेण्यात आला. तत्पूर्वी साखरखेर्डा पोलिसांनी सर्व किराणा दुकान तसेच गुलाल घाउक व किरकोळ विक्रेता यांना भारतीय नागरीक सुरक्षा संहीता कलम १८ प्रमाणे नोटीस बजावली होती. दरम्यान १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता साखरखेर्डा पोलीस, महसुल विभागाचे अधीकारी ग्रामविकास अधीकारी चनखोरे तसेच मंडळ अधीकारी रघुनाथ सोळंके, तलाठी लखण राजपुत, कोतवाल शुभम, अशोक खरात व वैभव सुधाकर तुपकर यांनी पंचासमक्ष आशीष किराणा स्टोअर्स, संकेत वाईनवार जवळील मलकापूर पांग्रा रोडवरील आशिष अरविंद बेदाडे यांच्या किराणा दुकानाजवळील गोडाऊनमध्ये १९ बॅग प्रत्येकी ५० किलो वजनाच्या प्रती बॅगमध्ये लहान १० किलोच्या ५ बॅग असलेल्या तसेच १० किलोच्या १३ बॅग मिळून आल्या. त्या बॅगवर ‘रॉकसॉल्टं’ असे लिहलेले असुन सदर गुलाल हातावर घेवून बोटास पाणी लावून चोळून पाहीले असता त्या गुलालामध्ये रासायणीक रंग व बारीक रांगोळी सारखी चुरी आढळून आली. त्यामुळे गुलाल जप्त करून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अपराधक्रं २३३/२०२४ बीएनएस कायदा कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!