मलकापूर :- येथील नूतन विद्यालयाजवळील हॉटेल रोहिणीमध्ये दारुच्या नशेत सहा जणांनी कर्मचाऱ्यासोबत वाद घालून एका व्यक्तीची सोन्याची चेन हिसकावल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी देवा ठाकूर आणि त्याच्या सहा साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवा ठाकूर आणि सहा जण हॉटेल रोहिणीमध्ये दारु पिण्यासाठी आले होते. दारु पिल्यानंतर त्यांनी बिलासंदर्भात कर्मचाऱ्यासोबत वाद घातला. या वादादरम्यान, ईश्वर बोबडे यांच्या गळ्यातील महागडी सोन्याची चेन देवा ठाकूर याने हिसकावली.
हॉटेल मालक केदार एकडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, त्यांच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे करत आहेत.
हॉटेल रोहिणी मध्ये वाद; गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मलकापूर शहरातील घटना!
