Headlines

मलकापूर मतदारसंघात भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यात गावकऱ्यांची मांदियाळी अन् निष्ठावंत कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी मारली दांडी ? अनेकांनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ; कार्यकर्त्यांमध्ये झाला संभ्रम निर्माण.!

मलकापूर ( उमेश इटणारे ):- गेल्या काही दिवसांपासून मलकापूर – नांदुरा मतदारसंघातील गावागावांमध्ये कोटी रुपयांचा भूमिपूजन सोहळा तसेच लोकार्पण सोहळा पार पडत आहे. त्यासाठी गावा गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य, पक्षाचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांना भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सांगितले जात आहे. मात्र या भूमिपूजन सोहळ्यापासून मलकापूर मतदार संघातील काही मोजकेच ज्येष्ठ नेते सोडले तर अनेक जेष्ठ नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहेत. ज्येष्ठ नेत्यांची विद्यमान आमदार यांच्याच्याबद्दल नाराजी तर नाही ना? अशी चर्चा परिसरामध्ये सुरु आहे. यामुळे भूमिपूजन सोहळ्यात गावातील नागरिकांची “मांदियाळी अन् कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नेत्यांनी मारली दांडी” असे दिसून येत आहे.
विद्यमान आमदार काम करत असताना ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेत नाही का..? जर विश्वासात घेत असतील तर भूमी पूजनापासून ज्येष्ठ नेत्यांनी पाठ का फिरवली..? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होत आहे तसेच मतदाता सुद्धा आचार्य व्यक्त करीत आहे. भूमिपूजन सोहळा करत असताना ज्येष्ठ नेत्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे सांगितले जात असते. मात्र मलकापूर – नांदुरा मतदार संघात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या भूमिपूजन सोहळ्याला अनेक ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित न राहता दांडी मारल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नेत्यांची विद्यमान आमदारांबद्दल नाराजी की भलतंच काही अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे.

कॉग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी भूमीपूजनाला मारली दांडी

मागील दिवसांमध्ये ग्रामीण भागामध्ये लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. मात्र या सोहळ्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दांडी मारली असल्याने हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. एन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असल्याने विद्यमान आमदारावर असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. अशी मतदार संघात चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *