सिंदखेड राजा: प्रतिनिधी :- सचिन खंडारे
राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर केंद्रीय पुरातत्त्व खातं यांच्यावतीने समाधीसमोर उत्खनन करून फरशी बसून बगीचा तयार करायचा आहे त्या अनुषंगाने समाधीसमोर उत्खनन सुरू असताना महादेवाचे मंदिर सापडले त्यामध्ये महादेवाची भव्य शिवलिंग सापडली मात्र मंदिराचा वरील सर्व भाग पडलेला असून शिवलिंगाच्या चारी बाजूने भिंत दिसून आली सदर बातमी सिंदखेडराजा शहर व परिसरात जनतेला माहित झाल्यानंतर नागरिकांनी तिथे गर्दी केली होती पाहण्यासाठी
@ राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनन सुरू असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे नागपूरचे अरुण मलिक तेथे उपस्थित होते त्यांनी सांगितले सदर महादेवाचे पिंड शिवलिंग हे अत्यंत पुरातन व जुने प्राचीन आहे या परिसरात अजून काय काय जमिनीमध्ये आहे त्याचा शोध घेण्यासाठी पुढे सुद्धा उत्खनन सुरूच राहणार असून विविध क्षेत्रातील तज्ञ बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले उत्खनन सुरू असताना केंद्रीय पूर्तता खात्याचे अन्य कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. पुरातन मंदिर सापडल्यामुळे या ठिकाणी आणखीन काही पुरातन अवशेष सापडण्याची दाट शक्यता पुरातत्त्व खात्याकडून वर्तवण्यात येत आहे .