Headlines

vidharbh

सततची नापिकी त्यात डोक्यावर “बँकेचे कर्ज’ अल्पभूधारक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

आसलगाव : सततच्या नापिकीमुळे त्यात डोक्यावर बँकेचे कर्ज या विवचनेतून येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण दयाराम बघे वय वर्ष ५२ यांनी दि.३० जुलै रोजी आत्महत्या केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही वर्षापासून सतत होत असलेल्या नापिकीमुळे व मागील वर्षी सुद्धा बोगस बियाणे मिळाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. अरुण बघे यांच्याजवळ १.११ आर इतकी…

Read More

गोडाऊन मधील 70 हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक साहित्याची चोरी, शेगाव शहर पोस्टेला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव : विद्युत कंत्राटदाराने गोडाऊन मध्ये ठेवलेले ७० हजाराचे इलेक्ट्रीक साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना येथील श्रीकृष्ण नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोस्टेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटदार नितेश दिलीप माने (३३) यांनी पोस्टेत तक्रार दिली की त्यांनी द्वारकामाई श्रीकृष्ण नगरात इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर…

Read More

चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

चिखली:- चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले यांचे अंगरक्षक यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले यांचे अंगरक्षक म्हणून अजय शंकर गिरी हे होते. काही दिवसापूर्वीच त्यांची मुंबईतून बुलढाणा येथे बदली झाली होती. अजय गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस…

Read More

म्हणे तुमचा क्यू आर कोड बंद पडेल, फॉर्मवर सह्या घेऊन सावरगाव नेहूच्या दुकानदाराची 95 हजारांनी फसवणूक

मलकापूर : भारत पे वरून ९५ हजार रूपयांचे माझ्या नावाने लोन घेऊन एटेल पेमेंट बँकेचे खाते उघडून फसवणूक केल्याप्रकरणी सावरगाव नेहू येथील शिवाजी दिनकर लांजुळकर यांनी नांदुरा पो. स्टे. ला तक्रार दाखल केली आहे.दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, माझे सावरगाव येथे जय गजानन प्रोव्हीजन दुकान असून माझ्या दुकानावर भारत पे कडून क्यु आर…

Read More

बिबट्याने शिकार करून पाडल्या बैलाच्या फळश्या, बैल ठार, गाय दोर तोडून पळाल्याने वाचला जीव; मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथील घटना!

मलकापूर :- बिबट्याने गाय आणि बैलावर हल्ला करून हल्ल्यात बैल ठार झाला तर गाय दोरी तोडून पळाल्याने गायचा जीव वाचला ही घटना भाडगणी परिसरातील काटी रस्त्यावर दि. 29 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभयित झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की भाडगणी येथील काटी रस्त्यावर समाधान पांडुरंग चोपडे यांची शेती…

Read More

कृष्णाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी,मराठा पाटील युवक समिती मलकापूर यांचे तहसीलदारांना निवेदन

मलकापूर:- खंडणीसाठी अपहरण करून शेगांव तालुक्यातील नागझरी येथील निरागस बालक “कृष्णा”च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मराठा पाटील युवक समिती,मलकापूर यांचे वतीने तहसीलदार साहेब मलकापूर यांना निवेदन सादर करण्यात आले. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय कृष्णा राजेश्वर कराडे या निरागस मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली,ही घटना समाज मन सुन्न करणारी असून मराठा पाटील…

Read More

शेतात जात असताना महिलेचा विनयभंग, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल! नांदुरा तालुक्यातील घटना

  नांदुरा : शेतात जात असलेल्या ३३ वर्षीय विवाहिते सोबत तिघांनी कारमधून येऊन रस्त्यामध्ये अश्लील चाळे करून विनयभंग करुन लैंगिक अत्याचार करीत खून करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजे दरम्यान तालुक्यातील कोकलवाडी-वरखेड शिवारात घडली.या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नांदुरा पोस्टेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात…

Read More

माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा!

मलकापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज २७ जुलै रोजी उबाठाचे जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने आदेशानुसार माजी युवासेना शहर प्रमुख पवन गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उबाठाचे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी युवासेना शहर प्रमुख पवन गरूड यांचे संकल्पनेतून…

Read More

हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न!

मलकापूर :- स्थानिक हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज दि. 28/07/2024 रोजी शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत प्रत्येक दिवस हा विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता. या सप्ताह दरम्यान शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले अध्ययन अध्यापन…

Read More

सकाळी झालेल्या बस अपघातातील तीन जणांची प्रकृती बिघडली ; बुलढाणा हलवले

मलकापूर: मलकापूर तालुक्यातील तांदुळवाडी नजीक ओव्हरटेक करणाऱ्या वाहणाऱ्या वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी होऊन अपघात झाला या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 29 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुमारास फौजी धाब्याजवळ घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की खामगाव आगाराची बस क्रमांक एम.एच 40 वाय. 5576 खामगाव वरून शिर्डी कडे प्रवासी घेऊन निघाली….

Read More
error: Content is protected !!