Headlines

vidharbh

विदर्भ लाईव्हच्या बातमी नंतर पुन्हा कचरा गाडी सुरू

मलकापूर :- शहरात दोन दिवसांपासून बंद असलेल्या कचरा गाडीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा, पसरलेली दुर्गंधी आणि डेंगूसह साथीच्या आजारांचा धोका यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. ही गंभीर बाब ‘दैनिक विदर्भ सत्ता’ने जोरकसपणे मांडली. या बातमीचा प्रशासनाने तातडीने गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अखेर कचरा संकलनाची गाडी पुन्हा…

Read More

शिवसेना (उ.बा.ठा) वर्धापन दिनानिमित्त शहरातील पुतळ्यांस दुग्धाभिषेक,माल्यार्पण,रुग्णांना फळे वाटप, मुकबधीर विद्यार्थांना अन्नदानाचा कार्यक्रम संपन्

  मलकापुर:- मलकापुर शहर शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.19 जुन गुरुवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्थानिक छत्रपती शिवाजी नगरातील तुळजाभवानी मंदिरात जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने ,शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत तालुकाप्रमुख दिपक चांभारे सह आदिंनी आई तुळजाभवानीची विधिवत पुजा करीत माल्यार्पण केले.तद्नंतर…

Read More

वर्दी नसतानाही ड्युटीवर? – RCP पथकातील किशोर बीबेचा उद्धटपणा उघड! वर्दी नाही म्हणजे शिस्त भंगाची कारवाही झालीच पाहिजे; पो.नी. गणेश गिरी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष; पाठीशी घालणार! की कारवाही करणार ?

मलकापूर ( दिपक इटणारे ) :- शहरातील पोलिसांच्या हलगर्जी व बेजबाबदार कारभाराचे नवे प्रकरण समोर आले आहे. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या वादावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – या प्रकरणात नागरिकांशी अश्लील वर्तन करणारा पोलीस कर्मचारी B.N 338 किशोर…

Read More

“शिस्त की उद्धटपणा? – मलकापूर पोलिसांची नागरिकांना अश्लील शिवीगाळ; संतप्त पत्रकारांचा ठणकाव” कर्तव्यदक्ष एस.पी. तांबे साहेब हे या पोलिसांना बोलण्याची पध्दत शिकवतील का ?

मलकापूर :- ‘सर्वसामान्यांचा रक्षक’ अशी ओळख असलेल्या पोलिसांच्या वर्तनावर मलकापूर शहरातील नागरिक आणि पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. काल रात्री शहरात दोन गटांत वाद होण्याची शक्यता असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केला, पण त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या बेजबाबदार आणि असभ्य वर्तनामुळे ‘जनतेचे मित्र’ ही प्रतिमा धुळीस मिळाली आहे. विशेष म्हणजे, या पोलीस कर्मचाऱ्याने थेट पत्रकार दीपक इटणारे…

Read More

मलकापूर शहरात कचरा गाडी बंद; नागरिक त्रस्त – दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) : शहरात गेल्या दोन दिवसांपासून कचरा उचलणारी गाडी बंद असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्याची सुरूवात झालेली असल्याने डेंगू, मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका अधिक वाढला असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कचरा गाडी बंद असल्याने काही नागरिकांनी घरासमोर व रस्त्यालगत उघड्यावर कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे,…

Read More

निंबोळा देवी दर्शन घेऊन नदीपात्रात अंघोळ करतांना पाय घसरून मायलेकींचा मृत्यू ;दोघा महिलांना वाचविण्यात स्थानिकांना यश

  मलकापुर:- नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी येथे देवी दर्शन घेऊन नदीपात्रात आंघोळ करीत असताना मायलेकींचा पाय घसरल्याने त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोन महिलाही पाण्यात डुबत असल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी बचाव कार्यास सुरुवात केली यात दोन महिलांना वाचविण्यात यश आले असून दोन्ही मायलेकींचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना आज दुपारी दोन…

Read More

सिमेंट पोल पाडून वीजतारा चोरणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून धो-धो धुतला; दोघे रुग्णालयात दाखल; मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील घटना

मलकापूर :- तालुक्यातील झोडगा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सिमेंट पोल पाडून वीज तारांची सुरू असलेली चोरी अखेर ग्रामस्थांनी थांबवली. सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांनी एकत्र येत रात्रीच्या सुमारास पोल पाडून तारा चोरणाऱ्या सहा चोरट्यांपैकी चार जणांना पकडले व त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर उर्वरित दोघांना गंभीर…

Read More

जागतिक पर्यावरण दिनी नांदुरा तहसील परिसरात वृक्षारोपण, हॅपी रिव्हर कम्युनिटी मिशन चा अभिनव उपक्रम

  नांदुरा : – 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “हॅपी रिव्हर कॉम्युनिटी मिशन” च्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबवित नांदुरा तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राहावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून “हॅपी रिव्हर कॉम्युनिटी मिशन” च्या सदस्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिन…

Read More

दैनंदिन व्यायाम करणारे मनोज टाक यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; मलकापूर शहरातील धक्कादायक घटना!

मलकापूर –“नित्य नियमाने व्यायाम करणं म्हणजे निरोगी आरोग्याचं लक्षण” अशी सामान्य धारणा असतानाच मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगरातील ५० वर्षीय मनोज टाक यांच्या अकस्मात निधनाने शहर हादरलं आहे. व्यायाम, शिस्त आणि सुसंवाद या गुणांनी सर्वांना आपलंसं करणाऱ्या मनोज टाक यांचा मृत्यू नेमका हाच प्रश्न उपस्थित करतो की, जीवन किती अनिश्चित आहे! सम्राट व्यायामशाळेमध्ये सुरक्षारक्षक म्हणून…

Read More

दुर्दैवाच्या धक्क्याने उसवलेले कुटुंब – चिखली-मेहकर रस्त्यावर एकाच अपघातात पती – पत्नीसह मुलाचा मृत्यू

चिखली : एका आनंदी प्रवासाचे दुःखद शेवट! रस्त्यावरचा एक क्षणाचा हलगर्जीपणा अख्ख्या कुटुंबावर काळाचा घाला ठरला. चिखली-मेहकर रोडवरील खैरव फाट्याजवळ ४ जून रोजी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात पती, पत्नी आणि त्यांचा अल्लड बालक जागीच मृत्युमुखी पडले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाही तुटल्या. खैरव फाटा ते मुंगसरी फाटा दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास मालवाहू…

Read More
error: Content is protected !!