
मोटारीची पिन काढत असताना 26 वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू
बुलडाणा :पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना काल 18 मे रोजी तालुक्यातील पांगरी येथे घडली. विजय रामकृष्ण गवई असे या युवकाचे नाव आहे. विजय गवई हा आज नळाचे पाणी भरत होता. या दरम्यान नळावर लावलेल्या वीजपंपाची पिन काढत असताना त्याला विजेचा जबर धक्का लागला. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास…