अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा
आसलगाव : तालुक्यातील वडगाव पाटण येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात एका वृद्धाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पाटण येथील अल्पवयीन मुलगी घरात खुर्चीवर बसून दूरदर्शन पाहत असताना गावातील सुरेश शालिग्राम…
