अमरावती : आपला प्रेमविवाह झाला असला तरी बायकोशी पटत नाही. आपण तिच्यापासून घटस्फोट घेणार आहोत, अशी बतावणी करून एका तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. ३० सप्टेंबर २०२३ पासून ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी १९ मे रोजी प्रतीक राजेंद्र तडसे (२३, रा प्रवीणनगर, अमरावती) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी व आरोपीची एका लग्नात ओळख झाली होती. आरोपीने तिचा मोबाइल नंबर घेत इन्स्टाग्रामवर मेसेज पाठविला. फोटोच्या बहाण्याने त्यांचे बोलणे सुरू झाले. त्यानंतर त्याने तरुणीला प्रपोज केले. त्यानंतर त्याने नागपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. तेथे तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष देत तिची दिशाभूल केली तथा अन्य एका ठिकाणीदेखील तिच्यावर अत्याचार केला.
लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत वारंवार नको ते केल,आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
