अकोला :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोलाने मोठी कामगिरी करत एमएसईबी मलकापूर येथील लाच प्रकरणातील फरार आरोपी शांतशील बोदडे (राहणार मलकापूर) याला अटक केली आहे. १० डिसेंबर रोजी विभागाने सापळा रचून कारवाई केली होती, मात्र शांतशील बोदडे फरार झाला होता.१२ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबवत बोदडे याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याच्यासह दुसऱ्या आरोपीलाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, आरोपींच्या इतर गुन्हेगारी कृत्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे एमएसईबी कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस आल्याचे बोलले जात आहे.