मलकापूर – विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता आयामाद्वारे शहरातील बाल गणेश मंडळ येथे सामाजिक एक्या करिता सामाजिक समरसता महाआरतीचे आयोजन दि. 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी शहरातील 43 समाजा मधून 86 गणमान्य बंधू यांना सहपत्नीक या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे सामाजिक समरसता विभागाचे जिल्हाप्रमुख विजय राखोंडे हे होते. कार्यक्रमाची सुरूवात बाप्पा चे पूजन गणेश वंदन भारत माता पूजन समोहिक गणेश अथर्वशीर्ष पठण, हनुमान चालीसा पठण द्वारे झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय राखोंडे यांनी बोलताना सांगितले की,
आपला भारत मोठा देश आहे. येथे अनेक जाती धर्माचे लोक राहतात. या धर्मांचे वेगवेगळे नियम आहेत ज्यामुळे हा सामाजिक भेदभाव कोणत्याही देशाच्या विकासात अनेक समस्या निर्माण करतो. सामाजिक समरसता म्हणजे हा सामाजिक भेदभाव दूर करून समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये प्रेम निर्माण करून सामाजिक समरसता अंगीकारणे म्हणजेच समाजातील सर्व लोक प्रेमाने एकत्र राहतात आणि त्यांच्यात एकता असते, यालाच सामाजिक समरसता म्हणतात. ज्या देशात सामाजिक एकोपा असतो तो देश खूप वेगाने विकसित होतो कारण सामाजिक समरसतेची नितांत गरज असते. समाजातील एकता टिकवून देशाला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी आपण सर्वांनी सामाजिक सलोख्याचा अवलंब केला पाहिजे. ईश्वराने सृष्टीमध्ये सर्वांना मानवाच्या रूपात पाठवले आहे आणि त्यांच्यामध्ये एकच चैतन्य आहे. हे मनापासून स्वीकारणे म्हणजे सामाजिक समरसता होय.
सामाजिक समरसता म्हणजे समाजातील सर्व वर्ग, जाती आणि धर्माच्या लोकांमध्ये एकता, सौहार्द आणि समता. सामाजिक समरसता आणण्यासाठी लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास आणि आदर असणे आवश्यक आहे. सामाजिक समरसतेसाठी लोकांनी जातिभेद आणि अस्पृश्यता दूर करणे गरजेचे आहे. असे ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक, व राजकीय क्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विशाल दवे विश्व हिंदू परिषद मलकापूर नगर उपाध्यक्ष यांनी केले. तर उपस्थित सर्व समाजातील जोडपे बाल गणेश मंडळ पोलीस प्रशासन, उपस्थित पत्रकार बंधू यांचे आभार खामगाव जिल्हा समरसता सहप्रमुख दीपक चवरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, मातृशक्ती मलकापूर व बाल गणेश मंडळ यांनी परिश्रम घेतले.