Headlines

मलकापूर एस.डि.ओ कार्यालयावर भव्य मोर्चा, जिगाव प्रकल्पातील बाधितांना न्याय देण्याची मागणी

मलकापूर :- जिगाव प्रकल्पातील अतिक्रमीत जमीन धारकांच्या न्यायहक्कासाठी व उपविभागातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी “कृती समितीच्या वतीने” मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांतभाऊ वाघोदे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचितचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे व ता. नेते अजय सावळे उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने तिन दिवसा अगोदर नोटिस देऊन या मोर्चाची परवानगी नाकारली होती परंतु कुठल्याही परिस्थितीत हा मोर्चा काढणारच असा आक्रमक पवित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतला होता.
त्या अनुषंगाने मलकापूर येथे,दंगल पथक,SRPF,अतिरिक्त कुमत, असा प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, या मोर्चाचा वाढता प्रभाव व अन्यायग्रस्त लोकांच्या मागणी कडे पाहता मलकापूर ठाणेदार यांनी तोंडी परवानगी दिली आणी नंतर लेखी परवानगी दिली. यावेळी संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चाचे तहसील चौकात सभेत रूपांतर झाले, मोर्चास प्रमुख नेत्यांनी संबोधित केले तथा मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. मोर्चाला संबोधित करताना प्रशांतभाऊ वाघोदे यांनी जिगाव प्रकल्पातील अनेक कुटुंब हे आपल्या उपजीविकेपासून उध्वस्त झाले आहेत जर का त्यांना न्याय मिळत नसेल तर मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी बाधित कुटुंबांना ईच्छा मरणाची परवानगी द्यावी तसेच जोपर्यंत जिगाव प्रकल्प अन्यायग्रस्तांना त्वरित न्याय न मिळाल्यास हा लढा अधिक तीव्र करीत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनाही घेराव घालण्यात येईल असा ईशारा सुद्धा दिला आहे.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, भाऊरावजी उमाळे ,संघपाल पनाड, मिलिंद वानखेडे, समाधान डोंगरे, मनोज खरात, अजाबराव वाघोदे, शेषराव उमाळे, अनिल धुंदाडे, राजरत्न तायडे, विलास तीतरे, राष्ट्रपाल खंडारे, राजु शेगोकार, भीमराव नितोने, विजय झनके, गणेश सावळे, यासीन कुरेशी, सुशील इंगळे,गौतम थाटे,संदिप थाटे, निलेश तायडे, शिवदास झाल्टे, भानुदास झाल्टे, सागर तायडे, अमोल तायडे, मिलिंद तायडे, समाधान तायडे सहित शेकडो कार्यकर्ते तथा महिला,अतिक्रमण धारक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!