मलकापूर (प्रतिनिधी): नगर सेवा समिती संचालित लीलाधर भोजराज चांडक शाळेत, दिनांक 31 ऑगस्ट रोजी आयुर्वेद व्यासपीठ बुलडाणा शाखा मलकापूर यांच्या वतीने ‘कळी उमलतांना’ या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या जपवणुकीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यार्थिनीच्या हस्ते यथोचित स्वागत करण्या आले.
डॉ. रश्मी काबरा आणि डॉ. प्रिति नाफडे यांनी मुलींच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर महत्त्वपूर्ण समुपदेशन दिले. विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीसह, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी व्यासपीठाने मोलाचे योगदान दिले.
या प्रसंगी आयुर्वेद व्यासपीठाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉ. अमित चौधरी, जिल्हा सचिव डॉ. राजेशजी झंवर, डॉ. प्रसन्न काबरा, डॉ. शारदा झंवर, डॉ. शुभांगी देशपांडे, डॉ. सोनाली बऱ्हाटे, डॉ. मानीषा खर्चे, डॉ. सुप्रिया देशपांडे आणि डॅा. स्मीता राठी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्यध्यापक डॉ. जयंत राजूरकर यांनी आयुर्वेद व्यासपीठाचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन सौ. अश्विनी कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबतची जागरूकता वाढेल.