धामणगाव बढे: राहत्या घरात गळफास घेऊन पंचवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रोहीणखेड येथे २६ जुलै रोजी घडली. विशाल राजू दसरे (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे.
याबाबत नामदेव फकिरा दसरे यांनी धामणगाव बढे पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात विशाल याने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे नमूद केले आहे. सदर तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे
याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
घरात गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, रोहिणखेड येथील घटना
