मलकापूर :- बिबट्याने गाय आणि बैलावर हल्ला करून हल्ल्यात बैल ठार झाला तर गाय दोरी तोडून पळाल्याने गायचा जीव वाचला ही घटना भाडगणी परिसरातील काटी रस्त्यावर दि. 29 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभयित झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की भाडगणी येथील काटी रस्त्यावर समाधान पांडुरंग चोपडे यांची शेती आहे. शेतात त्यांनी गाय आणि बैलाला नेहमीप्रमाणे चारा पाणी केले आणि बांधून रात्रीला घरी आले. सकाळच्या सुमारास बैलाची शिकार झाल्याची माहिती त्यानां मिळाली व त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता त्यांच्या बैलाची शिकार झाल्याचे दिसून आले. दरम्यान गाय ही दोरी दोडून पळाल्याने तिचा जीव वाचला असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याआधीही परिसरात अशाच घटना घडल्या असल्याने बैलाची शिकार बिबट्यानेच केली असावी असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी जोर धरत आहे.