मलकापूर :- मलकापूर तालुक्यातील प्रति शेगाव म्हणजेच घिर्णी गावातील बरेचसे नागरिक शेतीचे काम करण्यास सोपे व्हावे यासाठी आपल्या शेतामध्येच राहतात आणि तिथूनच आपला उदरनिर्वाह करता आणि आपल्या मुलांना शिकवतात परंतु अनेक वर्षांपासून त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी गावांमध्ये यावे लागते. दगड गोट्यांचा खडतर प्रवास करून नागरिक गावामध्ये पोहोचतात परंतु पावसाळ्यामध्ये ही स्थिती खूप बिकट होते. शाळांमध्ये आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागते . काही महिने अगोदर गावातील काही ठराविक शेतकरी व नागरिकांनी तालुक्याचे आमदार राजेश एकडे यांच्या कानावर ही बातमी टाकली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता निधी उपलब्ध करून दिला परंतु गावातील पुढार्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठा आक्रोश आहे. याकडे गावातील ग्रामपंचायतचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे अशी गावामध्ये चर्चा सुरू आहे, व स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांनी काम थांबून ठेवण्याची चर्चा सुद्धा गावात आहे.
सरपंच काय म्हणतात
शेताकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता भूमिपूजना मध्ये नाही ज्या रस्त्याचे भूमिपूजन झाले आहे त्या रक्ताचे काम अर्धवट झाले आहे .. उर्वरित काम पाऊस बंद झाल्या नंतर 10 ते 15 दिवसांनी करू
भगवान चोपडे, सरपंच

ग्रामस्थ काय म्हणतात
चार महिन्यापूर्वी सदाशिव दामाजी बोपले ते चांगदेव वाघमारे यांच्या शेतापर्यंतच्या रस्त्याच्या भूमिपूजन आमदार एकडे यांनी केले मात्र चार महिने उलटून गेले परंतु रस्ता झालेला नाही… फक्त भूमीपूजनाचे फोटोसेशन केले….. तीन-चार दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळे त्या रस्त्यावर चिखलच चिखल झाले असल्यामुळे लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे या कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी गावकरी करीत आहे.