मेहकर : राज्य राखीव पोलीस दलात भरतीसाठी जालना येथे मैदान चाचणी दरम्यान धावताना पडल्याने गंभीर जखमी सुरक्षा रक्षकाचे १९ ला उपचारादरम्यान निधन झाले आहे. मेहकर तालुक्यातील उकळी येथील ऋषीकेश कैलास चनखोरे (वय २६) हा तरुण मुंबई येथे महाराष्ट्र सुरक्षा दलात ओशिवरा मेट्रो स्टेशन मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होता. ११ जुलैला जालना येथे राज्य राखीव पोलीस दलात भरतीसाठी तो जालन्यात आला होता. मैदान चाचणी देताना धावत असताना तो अचानक उलटी होऊन खाली पडला. त्या नंतर प्राथमिक उपचारानंतर त्याला आधी मेहकर व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील जीवन हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. मात्र १९ जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उपचारादरम्यान सुरक्षा रक्षकाचे निधन,जालना येथे मैदान चाचणीत धावताना खाली पडून गंभीर जखमी झाला होता तरुण
