Headlines

माता महाकाली नगरातील जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

मलकापूर ( उमेश इटणारे ):- गेल्या महिनाभरापासून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र या प्रकाराकडे महिना उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने पाणीपुरवठा विभाग जाणून दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. माता महाकाली नगर येथील विवेकानंद आश्रम बाजूने गेलेली जलवाहिनी महिनाभरा पासून फुटलेली आहे. या जलवाहिनीतून हजारो लिटर फिल्टर केलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे पाण्याचा जपून वापर करा असा संदेश दिला जातो तर दुसरीकडे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष कसे? रोडवर असलेले पाणी, पुरवठा विभागाला दिसत नाही का?असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातआहे. या प्रकाराकडे लक्ष देऊन त्वरित जलवाहिनी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!