चिखली :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भगिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक दलाल सक्रीय झाले असून या दलालांना आपल्या कार्यालयामार्फत आवर घालण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने घडा शिकवणार असल्याचे निवदेन चिखली तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले आहे.
चिखली तालुका शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शिराळे पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या याि निवेदनात नमुद करण्यात आले आहे की , मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेनुसार प्रत्येक पात्र महिलेला १५०० रु प्रति महिना मदत प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी सेतु केंद्रावर प्रचंड मोठया प्रमाणात गर्दी केली असून याचा फायदा घेण्यासाठी चिखली तालुक्यातील अनेक सेतु केंद्रावर व इतरत्र दलाल सक्रीय झाले असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महिलांकडून रक्कम वसुल करण्यात येत असल्याबाबत शिवसेनेकडे महिलांनी तक्रार केली आहे.
त्यामुळे आपण या संदर्भात जातिने लक्ष घालून या दलालांना चाप बसवावा अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्यात यईल व त्यानंतर कायदा व सुव्यस्थ बिघडल्यास त्यास आपण जबाबदार रहाल याची नांद घ्यावी असेदेखील निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी शिवाजी शिराळे यांचे समवेत शिवाजी देशमुख , दत्ताभाउ, खरात विलास घोलप , गजानन मस्के, पंजाबराव जाधव,दिपक सुरडकर, ,सुभाष नरवाडे , ओम गायकवाड भास्कर मोलवडे , शिवराज भास्कराव कुटे , दत्तात्रय भुतेकर , शुभम भुनेकर , सतिश जाधव , गजुभैय्या इंगळे , राका मेहेत्रे , विनोद वनारे, पंजाब ठेंग , सांगर वैष्णव , आनंद हिवाळे , प्रथमेश आंभोरे, भानुदास पवार आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.