डोक्यावर बँकेचे कर्ज ‘कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

रिसोड : तालुक्यातील रिठद येथील शेतकरी जिजेबा भुजंगा बोरकर (७०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ८ रोजी सकाळी उघडकीस आली. पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जिजेबा बोरकर या शेतकऱ्याकडे अंदाजे पाच एकर जमीन असून या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जिल्हा बँकेच्या सेवा सहकारी सोसायटीचे माध्यमातून जवळपास एक लाख ३७ हजार रुपये कर्ज होते. परंतु त्याची परतफेड करता येत नसल्याने ते कायम विवंचनेत होते. दरम्यान, रविवारी रात्री घरुन निघून जात नजकीच्या पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. प्राप्त माहितीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रकरण तपासात घेतले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!