वृत्तसेवा
देऊळगाव राजा : व्यापाऱ्यांचा माल वाहनामध्ये भरुन जालना येथून जाफ्राबाद येथे घेवून जात असतांना अनोळखी चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवत ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पसार झाले. ही घटना मोती तलाव जवळील वनविभागाचे कार्यालयासमोर ६ जुलै रोजी घडली. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिध्देश्वर कडुबा राऊत वय २४ रा. सावखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना
हे त्यांचा चालक दिनेश अशोक बोराडे रा. गोंधनखेडा ता. जाफ्राबाद असे दोघे त्यांचे टाटा ४०७ वाहन क्र. एमएच ४३ AD ७५९९ मध्ये जालना येथील व्यापाऱ्यांचा वेगवेगळा माल भरुन जालना येथून जाफ्राबाद येथे घेवून जात होते. दरम्यान तोंडाला रुमाल बांधलेल्या चार अनोळखी चोरट्यांनी त्यांचे स्वीफ्ट डिझायर वाहन ४०७ वाहनासमोर आडवे लावून चाकुचा व रॉडचा धाक दाखवून ४०७ वाहनात घुसले व एका चोरट्याने वाहन
चालवून इतर तिघांनी राऊत यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच राऊत यांचेकडून ३० हजार रुपये नगदी, मोबाईल किं.१५ हजार व इतर असा एकूण ५० हजार रुपयांचा माल लुटून पसार झाले. याप्रकरणी सिध्देश्वर राऊत यांनी दे. राजा पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात ४ चोरट्यांविरुध्द अप क्र. २६९/२०२४ कलम ३०९ (६) भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि भारत चिरडे करीत आहे.