दि. १३ मे २०२४, मलकापूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथील विद्यार्थ्यांनी नुकताच इयत्ता १० वी सीबीएसई बोर्ड २०२३-२४ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, दर वर्षाप्रमाणे संपूर्ण मलकापूर तालुक्यातून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवत शाळेतील विद्यार्थ्यांनी रिद्धिका अजयकुमार शेखावत हिने ९७.८% गुण करून शाळेतून तसेच संपूर्ण तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करून १००% निकालाची परंपरा कायम राखून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे, त्याचरोबर तन्मय छगन चौधरी याने ९७.२% द्वितीय व राशी रुपेशकुमार चौधरी ९६.८% हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून गीत राहुल राणे (९६.६%), प्रथमेश शेलगेंवार (९५.८%), श्रावणी सुहास खंगार (९५%), अनुज प्रतापराव देशमुख (९५%), गोपाल विजयसिंह राजपुरोहित (९३.८%), लेख राजेश गोयंका (९२.४%), पलाश प्रशमिन अग्रवाल (९१.२%), ओम विजय चोपडे (९०.८%), भावना विजयसिंह राजपुरोहित (९०%), मोहित दीपक ठाकूर (८९.४%), देव विक्रम नैनानी (८९.४%), राज कैलास मोरे (८८.४%), श्रुती सुरेश आकोटकार (८७.२%), जानवी गणेशसिंह बयास (८६.२%), तन्वी धनंजय जोशी (८५.८%), रिया ओमकार बोंडे (८५.२%), अनुष्का संजय पाटील (८४.८%), अजिंक्य प्रवीण चव्हाण (८३.८%), कल्पेश प्रविण भिरुड (८३.६%), सानिका राजेश सरोदे ८१.६%,), सार्थक पाटील (८१.४%), सक्षम दीपकसिंग चौहान (८१.२%), तन्वी संजय पाटील (८०.२%) या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद गुण प्राप्त करून शाळेचे नावलौकिक वाढविले आहे. शाळेतील एकूण ७१ विद्यार्थ्यांनी प्रशंसनीय गुण प्राप्त केले आहेत, त्यासाठी तालुक्यातून प्रथम येणाऱ्या उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक श्री. अमरकुमार संचेती सर, संचालक मंडळ व शाळेच्या मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार तसेच शाळेचे शिक्षक व पालक वर्गाकडून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.