Headlines

चोरट्यांची हिंमत वाढली,पाठलाग करत दुचाकी स्वाराला धक्का मारून खाली पाडले, डोक्यावर टॉमिने मारहाण केली, 37 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला,मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापुर:- मलकापूर रेल्वे स्टेशनवर उतरून मोटारसायकल ने घराकडे जात असलेल्या 52 वर्षीय इसमाचा पाठलाग करून दाताळा येथील सातवळेश्वर मंदिराजवळील टि पाईन्ट जवळ पाठीमागून मोटारसायकल वर आलेल्या दोघांपैकी एकाने लाथ मारुन खाली पाडत जवळील लोखंडी टाॅमी ने डोक्यावर मारुन जख्मी करुन बॅगेतील रोख रक्कमेसह मोबाईल असा एकूण 37000/- हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी पाच वाजेदरम्यान घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील रामेश्वर प्रल्हाद व्यवहारे वय 52 हे आज सकाळी मुंबई येथून मुंबई अमरावती एक्सप्रेस ने मलकापूर रेल्वे स्थानकावर सकाळी पाच वाजता उतरले आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच २८ ए ए 3646 पॅशन या दुचाकीने सारोळा मारोती येथे जाण्यासाठी निघाले ग्राम दाताळा नजीक सातवळेश्वर मंदिरा परिसरातील टी पॉइंटवर पाठीमागून दुचाकी वर आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्या गाडीला लाथ मारून खाली पाडले जवळील लोखंडी टाॅमी ने व्यवहारे यांच्या डोक्यात मारले या मारहाणीत रामेश्वर व्यवहारे गंभीर जख्मी झाले त्यांच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला व्यवहारे यांच्याजवळील ऑफिशियल काळी बॅग त्या बॅगमध्ये नगदी तिस हजार रुपये, रेडमी कंपनीचा एक मोबाईल किंमत 7000, महत्त्वाची कागदपत्रे व सात आठ फाईल्स, दोन ड्रेस असा एकूण 37 हजार रुपये हिसकावून ते दोघे पळून गेले याबाबतची फिर्याद रामेश्वर व्यवहारे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली असून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 394 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंभीर जखमी असलेल्या रामेश्वर व्यवहार यांचेवर मलकापूर येथील डॉ.अरविंद कोलते यांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक संदिप काळे,लोकनेते ॲड हरीश रावळ, रा.काॅ.प्रदेश सचिव संतोषराव रायपुरे,पं.स.सदस्य रावसाहेब देशमुख, शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर ,पत्रकार विरसिंहदादा राजपूत आदिंनी रुग्णालयात धाव घेतली याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन ला कलम 394अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप काळे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *