मलकापूर:- मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत वातावरण तापत असताना शहरात एकच चर्चा रंगत आहे की, यंदा हिंदुत्वाच्या नावावर मते मागणाऱ्या भाजपची हवा मंदावली असून घड्याळ चिन्हावर उभे असलेले अजितदादा गटाचे नगराध्यक्ष पदाचे युवा उमेदवार प्रसाद जाधव यांच्याकडे मतदार मोठ्या प्रमाणात वळत आहेत. शहरातील गल्ली-बोळ, चौक, बाजारपेठ इथं सर्वत्र “नगराध्यक्ष प्रसाद जाधवच!” अशी चर्चा ऐकू येत आहे. प्रसाद जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कामांची शहरभर प्रशंसा होत असून कोणतीही अडचण असो युवा, महिला, ज्येष्ठ, व्यावसायिक किंवा सामान्य नागरिद प्रसाद जाधव तातडीने धावून जाणारे नेता म्हणून सर्वांमध्ये ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाच्या धडाडीमुळे आणि सर्वसमावेशक स्वभावामुळे नागरिकांचा कल थेट त्यांच्या बाजूकडे झुकू लागला आहे. याउलट, विधानसभेत केलेल्या जाहीरनाम्यातील एकही वचन पूर्ण न करू शकलेल्या भाजपकडून पुन्हा हिंदुत्वाचा गाजावाजा सुरू असला तरी, नागरिक यावर्षी ठामपणे विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे स्पष्टपणे बोलू लागले आहेत. “हिंदुत्व नाही, आता विकास हवा; आणि विकासासाठी घड्याळच वेळ बदलणार!” अशी भावना नागरिकांमध्ये दृढ होत आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीतून एकच चित्र स्पष्ट होते. मलकापूर शहरातील मतदारांचा ओघ तेजीने घड्याळ चिन्हाच्या बाजूने वाढत आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रसाद जाधव यांचे स्थान अधिकाधिक मजबूत झाले आहे.