Headlines

मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याचा महापूर.. विक्रीला पोलिसांची मूक संमती? कारवाईवर प्रश्नचिन्ह?

 

मलकापूर : – ( उमेश ईटणारे ) शहरात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम गुटखा विक्री सुरू असून पोलिसांच्या आशीर्वादाने हा धंदा फोफावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. शहरातील प्रत्येक चौक, पान ठेला आणि किराणा दुकाने याठिकाणी सहज गुटखा मिळत आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या नजरेसमोरच हा अवैध व्यवसाय बिनधास्त सुरू आहे. एकीकडे पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले असताना दुसरीकडे मलकापूरमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे की लक्ष्मी दर्शन झाल्यावर पोलिसांची नजरच बदलते. शहरात इतक्या मोठया प्रमाणात गुटखा विक्री होत असताना प्रश्न उपस्थित केला जातोय की गुटखा येतो तरी कुठून? पोलिसांना याची खबर नाही का? माहिती असूनही कारवाई का होत नाही? या प्रश्नांवर मात्र प्रशासन मौन बाळगताना दिसत आहे. नागरिकांच्या मते अवैध धंद्यांवर पोलिसांचा हात असल्यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत दारू, गुटखा आणि जुगार यांसारखे धंदे खुलेआम सुरू असून पोलिसांचा धाक पूर्णपणे संपल्याचे चित्र शहरात स्पष्टपणे दिसत आहे. शहरात कायदा अंमलबजावणी करणारेच जर डोळेझाक करत असतील तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा करायची असा सवाल शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!