शेगाव :- लोहमार्ग पोलीस ठाणे शेगाव हद्दीत बोदवड रेल्वे स्टेशन येथे एका अनोळखी पुरुषाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना 08 ऑक्टोबर रोजी घडली असून, घटनेची नोंद पोलीस हवालदार अमोल खोडके यांनी घेतली आहे. प्राथमिक तपासानुसार मृत व्यक्तीचा मृत्यू रेल्वे अपघातात झाल्याचे समोर आले आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, उंची सुमारे 5 फूट 5 इंच, रंग सावळा, बांधा सडपातळ, पोटावर काळा मस, उजव्या हातावर “ॐ” गोंदलेले, हनुवटीवर दाढी, काळी बारीक मिशी, अंगात फिकट हिरव्या रंगाची टी-शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, निळ्या रंगाची अंडरवेअर असे आहे. मृतदेहावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, मलकापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह सरकारी दवाखाना मलकापूर येथे शीतगृहात ठेवलेला आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींनी माहिती असल्यास लोहमार्ग पोलीस स्टेशन, शेगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.