Headlines

नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची शिवसेना (उबाठा) ची तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी!

नांदुरा:- नांदुरा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी करीता आणि ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांच्या करिता तसेच

अतिवृष्टीमुळे ज्यांच्या विहिरी खचल्या त्यांचे त्वरित पंचनामे करा,ज्या शेतकऱ्यांचे पोलवरील तार चोरीला गेले ते तार रब्बी हंगामासाठी लवकर लावण्यात यावे,सोयाबीन ला कोंब फुटले ,ओला दुष्काळ जाहीर करा,एकरी ५० हजार रुपये अनुदान द्या
इ. मागण्यांकरीता आज नांदुरा तहसीलदार यांचे कडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, उपतालुकाप्रमुख विष्णू धोरण,अर्जुन तांगडे , ईश्वर कुटे, संदीप रायपुरे, गणेश घुले, श्रीकृष्ण गावंडे, राजकुमार मापारी, विठ्ठल सरोदे,रमेश पाटील, राजरत्न वलवणकर, बाबुराव मस्के, हर्षवर्धन सरदार सह शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!