Headlines

कोलते महाविद्यालयात दोन दिवसीय स्वायत्तता कार्यशाळा उत्साहात संपन्न

 

मलकापूर :- पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पॉलिटेक्निक विभागात दोन दिवसीय स्वायत्तता कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेत देशातील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. आवारी व डॉ. जी. व्ही. गोतमारे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. जी. के. आवारी हे एआयसीटीई मार्गदर्शक, मान्यताप्राप्त संशोधक व 31 वर्षांहून अधिक अध्यापन अनुभव असलेले ज्येष्ठ तज्ज्ञ असून त्यांनी एनबीए मान्यतेचे निकष, ओबीई तत्त्वज्ञान व शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आवश्यक शैक्षणिक सुधारणा यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांना शैक्षणिक नियोजन व अंमलबजावणीबाबत नवे दृष्टिकोन लाभले. तर डॉ. जी. व्ही. गोतमारे हे विद्युत अभियांत्रिकी विषयातील प्रख्यात संशोधक व अभ्यासक्रम रचना तज्ज्ञ असून त्यांना 36 वर्षांहून अधिक अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी स्वायत्ततेच्या प्रक्रियेत अभ्यासक्रम विकास, मान्यतेसाठीचे प्रयत्न, आऊटकम बेस एज्युकेशन तसेच प्रश्नपत्रिका निर्मिती व हरित ऊर्जा तंत्रज्ञान यावरील अनुभव मांडले.

या कार्यशाळेसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे तसेच संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार सुधीर पाचपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग व अध्यापनबाह्य कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे ही कार्यशाळा यशस्वी झाली.

कार्यशाळेत मोठ्या संख्येने शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या चर्चेतून शैक्षणिक स्वायत्ततेसाठी आवश्यक दिशा, कार्यपद्धती व सुधारणा यांचे उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. या कार्यशाळेतून पुढे आलेल्या संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणून पॉलिटेक्निक विभागाची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महाविद्यालयाचे स्वायत्तता समन्वयक व कार्यशाळेचे समन्वयक प्रा. साकेत एस. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचणे, प्रा. पांडुरंग भिसे, प्रा. संदीप मुंडाळे, प्रा.जयप्रकाश सोनोने, प्रा. महेश शास्त्री, प्रा. गजानन सुपे, प्रा. मधुकर टेकाडे, प्रा. पराग चोपडे, प्रा. मनोज वानखेडे सह प्राध्यापिका तेजल खर्चे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!