मलकापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल, मलकापूर येथे १४ वर्षाखालील तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा मुलांमध्ये नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत विविध शाळांचे कबड्डी संघ सहभागी झाले. या स्पर्धेत नूतन इंग्लिश स्कूलच्या कबड्डी संघाने दमदार खेळ सादर करत सलग तीन सामने जिंकले व अखेरीस तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. सुरेश खर्चे सर, उपप्राचार्य, क्रीडा शिक्षक आकाश लटके सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कबड्डी संघाचे अभिनंदन केले.