मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) मलकापुरचे विद्वान डॉ. दीपक झोपे यांनी पुन्हा एकदा आपले शैक्षणिक वर्चस्व सिद्ध केले आहे. १५ जून २०२५ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH SET-2025) मध्ये त्यांनी महाराष्ट्रभरातून दुसरा क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मलकापुरसह संपूर्ण परिसरात आनंदाची लाट उसळली आहे. डॉ. झोपे यांच्या यशाचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे महत्त्व मानले जात असून, स्थानिक नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या अथक मेहनतीला आणि ज्ञाननिष्ठेला या निकालातून योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. तरुण पिढीसाठी डॉ. झोपे हे प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत. योग्य दिशा, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर शैक्षणिक यशाची शिखरे गाठता येतात हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. या यशामुळे मलकापुरचे नाव राज्यभर उजळले असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास स्थानिक समाजाने व्यक्त केला आहे.
मेहनतीला यशाचा मुकुट; डॉ. दिपक झोपे यांना MH SET मध्ये महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक!
